आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात म्हशीचे आठवडी बाजार सुरू करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख दुर्गेश काठोठीवाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
या वेळी उपजिल्हाप्रमुख बाबूराव पवार, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, गणेश तरासे, चेतन भुरेवाल, सुरेश गंगासागरे, धन्नुलाल भगत, कन्हैयालाल काठोठीवाले, रामअप्पा परडकर, लखनअप्पा दत्ता खरजुले, मोहन गिराम, शेख शफीक, युसूफ कुरेशी, अर्जुन भगत, जय भगत, घनश्याम भुरेवाल आदी आदी उपस्थित होते.
गत ३ महिन्यापासून लम्पी रोगामुळे आठवडी बाजार बंद आहेत. परंतु जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव कमी आहे. बाजारात गायीची व गोऱ्ह्याची खरेदी विक्री नगण्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी म्हशीसाठी बाजार सुरू करण्याची परवानगी द्यावी, पशुपालकांचा उदरनिर्वाह म्हशीवर अवलंबून आहे. याची दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.