आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला. यामध्ये भोकरदन तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता जाहीर झाली असून १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होईल. २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावकारभाऱ्यांच्या राजकीय मोर्चाबांधणीला सुरुवात झाली असून मतदारांच्या गाठीभेटींना वेग येणार आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी संबंधित तहसिलदारांकडून १८ नोव्हेंबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ५ डिसेंबरला सकाळी ११ पासून उमेदवारी अर्जांची छाननी सुरू होणार आहे. ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. यानंतर चिन्ह वाटप होणार आहे. १८ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान होणार आहे. २० डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. निवडणुका जाहीर झाल्यामुळे गावांमध्ये राजकीय मोर्चाबांधणीला वेग आला आहे. ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे राजकीय वाटचालीमधील पहिली पायरी. ही पायरी यशस्वीरित्या सर करण्यासाठी अनेक इच्छूक सरसावले आहेत. सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होत असल्यामुळे प्रत्येक गावात चुरस वाढली आहे.
या ग्रामपंचायतींसाठी होणार निवडणूक
भोकरदन तालुक्यातील कठोरा जैनपुर, सावंगी अवघराव, रेलगाव, कोठा कोळी, खामखेडा, शेलुद, जायदेववाडी, वालसा खालसा, मनापुर, पदमावती, चो-हाळा- मासनपुर, भिवपुर, देहेड, एकेफळ, गव्हाण संगमेश्वर, गोकुळ, जवखेडा बु, जवखेडा खु, करजगाव, लतिफपुर-फुलेनगर, मोहळाई, नांजा-क्षिरसागर, निंबोळा, पळसखेडा दाभाडी, पिंपळगाव बारव-पळसखेडा ठोबरे, पिंप्री, राजुर, ताडकळस, तपोवन-तपोवन तांडा, वडशेद, वालसा डावरगाव, वरुड बु.या ३२ गावांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.