आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअदानीच्या गैरकारभाराचा भंडाफोड झाला असुन तब्बल ७ लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. केंद्र (मोदी) सरकारने अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व झतर सरकारी वित्तीय संस्थांचा पैसा बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. हा पैसा सुरक्षित राहावा व गौतम अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणी साठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार जालना जिल्हा काँग्रेस कमिटी कडून जिल्हाभर आंदोलन करनार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सांगितले.
भोकरदन येथे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी द्वारे शहरातील एसबीआय बँकेच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, तालुकाध्यक्ष त्रिंबकराव पाबळे, प्रदेश पदाधिकारी भाऊसाहेब सोळुंके, अनिल देशपांडे, युवक जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, संतोष अन्नदाते, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी,शेख रिझवान, चंद्रकांत पगारे, महेश दसपुते, शालीकराम गावंडे, दादाराव भोंबे, दादाराव देशमुख, शेख सलीम, विष्णु भालेराव, सुखदेव रावळकर, कैलास सुरडकर,आजीज पार्टी, अनिल पगारे, रमेश जाधव, सोपान सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते
भोकरदनच्या एसबीआयसमोर केले आंदोलन उद्योगपती गौतम अदाणी यांच्या उद्योगसमूहावर ‘हिंडेनबर्ग’ने गंभीर आरोप केले आहेत. अदानीप्रवर्तीत उद्योगसमूहाने दशकांपासून ताळेबंदात आणि लेखांमध्ये गैरप्रकार केल्याचं अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार संस्था ‘हिंडेनबर्ग’च्या एका अहवालात म्हटलं आहे. यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. अदाणी समूहाच्या चौकशीची मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात भारतीय जीवन आयुर्विमा ( एलआयसी ) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांसमोर आंदोलन करण्यात आलं.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.