आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:केंद्रीय पथक करणार पर्दाफाश;जिल्ह्यातील कामांची आज पथक करणार पाहणी

प्रताप गाढे । जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पोकरा योजनेतून गोडाऊन, औजार बँक अशा घटकांचा लाभ घेणारे पहिले लाभार्थी असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कामांची गुरुवारी (१५ डिसेंबर) मुख्य पथकाकडून पाहणी केली जाणार आहे. पोकराचे वरिष्ठ अधिकारी तसेच शेतीसाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या हिमाचल प्रदेशातील आयडीपी संस्थेच्या अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश आहे. यास “एक्स्पोज’ दौरा असे नाव दिले आहे. त्यामुळे लाभार्थी, शेतकरी, उत्पादक कंपन्या अलर्ट झाल्या आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेतून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या व्यावसायिक प्रस्तावांना साहाय्य केले जाते.

तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गट यांना सक्षम करणे तसेच शेतीमालाचे मूल्यवर्धन करणे, शेतीमाल एकत्र करून प्रक्रिया करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी पोकरा योजना प्रकल्पातून मदत प्रकल्प म्हणून ६० टक्के अनुदानही देण्यात येते. जालना जिल्ह्यात २८३ गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामध्ये नवसंजीवनी मिळाली आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

शेतीमालाचे मूल्यवर्धन करणे, शेतीमाल एकत्र करून प्रक्रिया करणे, कृषी उत्पादनाचे संकलन, वर्गीकरण व प्रतवारी केंद्र, गोदाम, फळ पिकवणी केंद्र, कृषी मालावर प्राथमिक प्रक्रिया केंद्र, शीत वाहन इत्यादी प्रकारची उद्योग उभारणी या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दरम्यान, आजपर्यंत योजनांचा लाभ घेत असलेल्या निवडक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी लाभ घेतलेल्या योजना, साहित्याचा वापर, प्रत्यक्षात सुरू असलेले काम आदींची माहिती घेतली जाणार आहे. यासाठी हे पथक गुरुवारी या गावांना भेटी देणार आहे.

जिल्हात पोकरा योजनेचे ३ हजार शेतकरी गट
जालना जिल्हात पोकर योजनेचे तीन हजार ११२ शेतकरी गट कार्यरत आहेत. या प्रत्येक गटामध्ये १५ सदस्य आहेत. तसेच ३५६ शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. या मार्फत जिल्हात सुरू असलेल्या कामांची पाहणी या केंद्रीय पथकाकडून केली जाणार आहे.

बाजार वाहेगावात शेतकऱ्यांशी संवाद
बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील शेतकऱ्यांबरोबर हे पथक चर्चा करणार आहे. ज्यामध्ये शेडनेट, फळबाग लागवड, शेत तलाव आदी बाबींची माहिती जाणून घेणार आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवरही ते मार्गदर्शन करणार आहेत.

तीन ठिकाणी देणार भेटी
सॉइल ते सिल्क रेशीम फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड (कचरेवाडी वडगाव) येथे भेट देणार असून या ठिकाणी कंपनीने साकारलेल्या चॉकी सेंटरची पाहणी करणार आहे. शिवाय या कंपनीच्या सदस्यांबरेाबर चर्चा करणार आहे.

संकल्प कृषी विकास प्रोड्युसर कंपनी लि. नंदापूर या कंपनीने गोडाऊन, वेअरहाऊस, शेडनेटच्या माध्यमातून डिजिटल शेतीकडे शेतकऱ्यांना वळवले आहे. शिवाय औजार बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माेठा हातभार मिळवून दिला आहे.

विठ्ठला फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. या शेतकरी उत्पादक कंपनीने गोडाऊन तसेच वेअरहाऊसची निर्मिती करून शेतकऱ्यंासाठी शेतीमालाला योग्य भाव येईपर्यंत माल साठवून ठेवण्याची व्यवस्था केली आहे.

बातम्या आणखी आहेत...