आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारावास:धनादेश वटला नाही; कर्जदारास दोन महिन्यांचा कारावास, दंड

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देविगरी नागरी सहकारी पतसंस्थेस दिलेला धनादेश न वटल्यामुळे कर्जदारास दोन महिन्यांचा कारावास व ५० हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आल्याची माहिती देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली.

देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या टेंभुर्णी शाखेतून प्रल्हाद बाबुराव जगताप (निवडूंगा, ता. जाफराबाद) यांनी २००६ मध्ये कर्ज घेतले होते. सदर कर्ज थकल्यामुळे कर्जदार यांनी देवगिरी पतसंस्थेस ३१ हजार १०७ रुपयांचा धनादेश दिला होता. सदर धनादेश न वटल्यामुळे देवगिरी नागरी सहकारी यांनी प्रथम न्यायदंडाधिकारी जाफराबाद यांच्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता.

या प्रकरणात सर्व साक्षी पुरावे व दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून सोमवारी न्यायाधीश क. स्तर ए. डी. गाडे यांनी प्रल्हाद जगताप यांना दोन महिन्यांचा साधा कारावास व नुकसान भरपाई म्हणून दाेन महिन्यांच्या आत ५० हजारांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. मुदतीत दंड न भरल्यास आणखी दोन महिन्यांचा कारावास देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात संस्थेतर्फे वकील रामेश्वर अंभोरे यांनी बाजू मांडल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...