आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी नगरसेवक, नगराध्यक्ष नाही तर या राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचा पाहू इच्छितो. देशाला दिशा देणारा आपला समाज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.
समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने पाठक मंगल कार्यालयात भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नाना महाराज पोखरीकर, रामदास महाराज आचार्य, विनायक महाराज फुलब्रीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उद्योजक घनश्याम गोयल, ज्ञानेश्वर भांदरगे, भास्कर दानवे, सुनील आर्दड, पंडित भुतेकर, राजेश राऊत, उद्योजक राहुल अग्रवाल, गणेश सुपारकर, संजय देठे, राजेंद्र भोसले, समितीचे अध्यक्ष अॅड. सुनील किनगावकर, स्वागताध्यक्ष विलास नाईक, अॅड. बलवंत नाईक, नारायण चाळगे यांची उपस्थिती होती.
यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले, आजचे मुख्यमंत्री परशुरामच आहेत. मनोहर जोशी आपल्याच समाजातील होते आजच बाजीराव पेशवे चौकाचे उद्घाटन केले. हा चौक जसा केला तसाच दीपक रणनवरे यांनी बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याची मागणी केली ती शासन दरबारी मांडून पुतळ्यासाठी मान्यता घेऊ. यावेळी सर्व समाजातील अध्यक्षाचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांचे प्रास्ताविक अॅड. सुनील किनगावकर यांनी केले सुत्रसंचालन दीपक रणनवरे रवींद्र देशपांडे यांनी तर विलास नाईक यांनी आभार मानले.
यावेळी सुरेश मुळे, अमोल मोहरीर, अॅड. विनोद कुलकर्णी, डॉ. संजय रुईखेडकर, अनंत वाघमारे, सुरेंद्र न्यायाधीश, श्रीपाद रत्नपारखी, दिगंबर काजळकर, शिवाजी जोशी, शशिकांत दाभाडकर, दिलीप देशपांडे, सतीश पुराणिक, मुकुंद कुलकर्णी, विजय फुलब्रीकर, महेश बुलगे, संजय देशपांडे, प्रसाद पाटील, राहुल मुळे, विश्वंभर कुलकर्णी, जगदीश गौड, मधुसूदन दंडारे, सुबोध किनगावकर, सतीश अकोलकर, गोपी मोहिदे, पवन देशमुख, सुरेंद्र कल्याणकर, कल्याण कुलकर्णी, किरण मुळे, आनंदी अय्यर, विशाखा नाईक, पौर्णिमा रुईखेडकर, अप्पा देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.