आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालहान मुलांचे भावविश्व खूप वेगळे असते. आपल्याला ते जाणून उमजून घेणे फार गरजेचे असते. जर आपण ते समजून घेतले तरच त्यांचे बालपण कोमेजून जाण्याऐवजी अबाधित राहील. लहान मुले ही मातीच्या गोळ्यासारखी असतात.आपण जसा आकार देऊ तशी ती घडत जातात पण यासाठी त्यांना हाच आकार हवा, हाच आकार त्यांच्यासाठी योग्य आहे. असा अट्टाहास मात्र करू नये. त्यांना जसे हवे तसे घडू द्यावे आणि हे काम सावरगाव हडप केंद्राने आयोजित बिटस्तरीय बालसाहित्य संमेलनाच्या माध्यमातून करुन दाखवले असे प्रतिपादन जालना पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी आसावरी काळे यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना वर्षा मीना, शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक मंगल धूपे, गटशिक्षणाधिकारी पं.स. जालना आसावरी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ फेब्रुवारी रोजी सावरगाव हडप बीटचे बीट स्तरीय शैक्षणिक बालसाहित्य संमेलन २०२३ साहित्याचे बीजांकुरण या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. भरत वानखेडे, प्रसिद्ध कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर, जेष्ठ चित्रकार श्रीधर आंभोरे, वरिष्ठ अधिव्याख्याता डायट जालना प्रा. संजय येवते, प्रा. डॉ. यशवंत सोनुने, जालना अधिव्याख्याता डायट जालना योगेश जाधव, गटसमन्वयक जालना पी. आर. जाधव, केंद्र प्रमुख नेर बी. बी. पवार, डॉ. करुणा हिवाळे, सी. बी. जाधव, मुख्याध्यापिका शिवाजी विद्यालय हस्तेपिंपळगाव भांबरे, जीजा वाघ (कवी), आरती जोशी, पंडित लव्हटे, राजेन्द्र शेळके, सतीष श्रीखंडे, प्रणिता लव्हटे, प्रमोद साठेवाड, अनिल कुरकुटे यांची उपस्थिती होती. या बाल साहित्य संमेलनाचे प्रमुख संयोजक डॉ. भरत वानखेडे शिक्षण विस्तार अधिकारी प्रास्ताविकात म्हणाले की, शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून त्यामधून आपल्या भावभावनांचे प्रकटीकरण, अनुभवलेल्या भाव विश्वाचे चित्रण करता येणे किंबहुना संभाषणातून लेखनातून व्यक्त होता येणे अपेक्षित आहे.
यासाठी साहित्याचे बीजांकुरण हे साहित्य संमेलन उपयुक्त ठरणार आहे. सावरगाव हडप बीट मधील सर्व शिक्षक यांचे सोबत केंद्र प्रमुख यांच्या सहकार्याने वेळोवेळी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आल्या त्याचीच फलश्रुती म्हणून सावरगाव हडप बीट मधील केंद्र सावरगाव हडप, सिंधीकाळेगाव, उटवद आणि सावंगी तलाव केंद्रातील जिल्हा परिषद शाळेतील १३४ विद्यार्थ्यांनी कवीता, गवळण, चारोळ्या, कथा, गोष्ट, पवाडा, गोष्ट ग्रामीण नृत्य इत्यादी कलागुणांच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सावरगाव केंद्र प्रमुख सुभाष सातपुते, सुजाता भालेराव, भागवत जटेवाड, अशोक उबाळे, सुनील ढाकरगे, रनशुर सर, के. एल पगारे, लक्ष्मण मुळे, मुख्याध्यापक भाटेपुरी, विनोद तिळवणे, मंडपे, सुरवाडे, एकनाथ मुळे, कुसूम पर्यटन केंद्र सिंधीकाळेगाव, सरपंच सिंधीकाळेगाव, अध्यक्ष, आदींचे सहकार्य लाभले.
बाल साहित्य संमेलन अनोखे
प्रसिद्ध कवयित्री डॉ. संजिवनी तडेगावकर बोलतांना म्हणाल्या की, भविष्यातील लेखक कलावंत शिक्षका हाती उद्याचा निर्माण होणारा कवी कलावंत लेखक हा अभ्यासक्रमापेक्षा शिक्षक घडवित असतो. याची असंख्य उदाहरणे आहेत जे शिक्षकामुळे घडले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.