आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकात्मतेचे दर्शन:अंबा भवानीच्या जयघोषाने दानापूर नगरी दुमदुमली; या उत्सवाच्या माध्यमातुन सामाजिक एकोपा जोपासला जात असल्याने एकात्मतेचे दर्शन येथे घडून येत आहे

दानापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथे दरवर्षी प्रमाणे माता अंबादेवीच्या स्वारीने दानापुर दानापुर नगरी दुमदुमून गेली. यावेळी गावातील लहान-थोर भाविकांनी देवीच्या सोगांचे मनोभावे दर्शन घेतले. या उत्सवाच्या माध्यमातुन सामाजिक एकोपा जोपासला जात असल्याने एकात्मतेचे दर्शन येथे घडून येत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे हा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता, यंदा कोरोना प्रादुर्भाव जवळपास संपुष्टात आला असल्याने भाविकांनी अत्यंत उत्साहात व जल्लोषात हा उत्सव साजरा केला.

सकाळीच महिलांनी आपआपल्या घरासमोर सडा रांगोळी टाकून मातेचे मनोभावे औक्षण करून देवीच्या स्वारीची मिरवणुक काढण्यात आली. देवीच्या स्वारीचे मानकरी संतोष नारायण दळवी यांनी अंबा भवानी मातेचे सोंग घेतले होते. स्वारीची सांगता प्रा. डि. आर. शेळके यांच्या हस्ते सपत्नीक महाआरतीने झाली.

बातम्या आणखी आहेत...