आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी पदवीधर मतदार संघाची निवडणूक आचार संहितेमुळे खर्ची घालता आला नाही. आता आचार संहिता संपली असून, कामांचा धडका सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचार संहिता लागण्याची शक्यता आहे.जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, प्रादेशिक पर्यटन, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कोट्यवधी रूपये पडून आहे.
मात्र, अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे आचार संहिता लागू झाली होती. गुरुवारी मतमोजणी आटोपली असून, आता आचार संहिता सुद्धा संपली आहे. त्यामुळे येत्या काळात कामांचा धडाका चालू होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह नगर पालिकेत प्रशासक राज आहे. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आचार संहिता लागण्यापूर्वीच संपूर्ण कामे आटोपून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विभागांनी निविदा प्रक्रिया राबवून संबंधित कामाचे कार्यादेश द्यावे. दिलेला निधी परत जाणार नाही याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मागिल बैठकीतच दिले होते. संपूर्ण निधी १५ मार्चपर्यंत खर्ची घालावा, अन्यथा संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची राहील असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.
प्रलंबित मान्यता निघणार निकालीजिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतील कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यान, अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक आचारसंहितेमुळे बहुतांश विभागांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रलंबित होत्या. आता आचारसंहिता संपताच मान्यता मिळणार असून, लवकरच वर्कऑर्डर काढण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.