आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक चर्चा:मराठा आरक्षणाबाबत आठ दिवसांत समाजाला आनंदाची बातमी मिळेल

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे साष्टपिंपळगाववासीयांना आश्वासन

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे तब्बल दोन महिने राज्यव्यापी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात काही दिवस अन्नत्यागही करण्यात आला होता. दरम्यान, मुख्यमंत्री यांच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मध्यस्थी करून हे अन्नत्याग आंदोलन थांबवले. दरम्यान, मुंबई येथे गुरुवारी साष्टपिंपळगावचे आंदोलक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मराठा समाजाच्या मुख्य मागणीसह इतर काही मागण्यांवर चर्चा झाली असता, आरक्षणाबाबत आठ दिवसांत आनंदाची बातमी येईल, अशी माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी आंदोलकांना दिली आहे. यामुळे आंदोलकांतून समाधान व्यक्त होत आहे. परंतु, मराठा आरक्षण निकाल लागेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पावित्रा साष्टपिंपळगाववासीयांचा असून, आंदोलनाचा आजचा ६९ वा दिवस आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत आम्ही ही लढाई कोर्टात भक्कमपणे पुरावे सादर करून जिंकूच. बाकीची राज्येही महाराष्ट्राच्या आरक्षण मर्यादा वाढीच्या मताशी सहमत आहेत. सारथी संस्था लवकरात लवकर सुरू करावी आणि संस्थेवर खोटे आरोप केले गेले आणि संस्थेमध्ये अपुरा स्टाफ आहे, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी मांडले. त्यावर संस्थेसाठी जागा दिली आणि त्यातील स्टाफ लवकरच भरून होतकरू विद्यार्थ्यांना मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, या मागणीवरही काहींना नोकरी दिली आहे व दिली नसेल तर त्या सर्वांना दिली जाईल, आपण त्यांना घेऊन यावे, आम्ही सरकार म्हणून त्यांची ऑर्डर काढत आहोत, अशी माहितीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. साष्टपिंपळगाव येथून ५ सदस्यीय एक शिष्टमंडळ वर्षा निवासस्थानी बैठकीस गेले होते. त्यात मनोज जरांगे पाटील, भारती संजय कटारे, वैष्णवी दीपक जाधव, मुक्ताबाई ढेपे, गीता तांबडे हे शिष्टमंडळातील सदस्य, मुख्यमंत्री यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. मराठा आरक्षण निकाल लागेपर्यंत आंदोलन साष्टपिंपळगाव येथे सुरूच राहणार आहे.

या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही उपस्थित होते. त्यांनीही सर्व मराठा समाजाच्या मागण्यांवर सहमती दर्शवली व तीन दिवसांत मागण्यांबाबत लेखी पत्र साष्टपिंपळगाव आंदोलन ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने पाठवले जाईल, असे उपस्थित असलेल्या शिष्टमंडळाला सांगितले.

फीस परत करण्याचे आश्वासन : आझाद मैदानावर बसलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्यात येतील, कोरोना काळातील विद्यार्थ्यांकडून फीस घेतली होती, ती फीस परत करण्यात यावी किंवा पुढील शैक्षणिक वर्षात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी केली असता, त्यावरही निर्णय घेऊन संबंधित रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...