आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्टमंडळाला मोपलवार यांचे आश्वासन‎:कारखान्याच्या जमिनीचा‎ मोबदला ईडीकडे करणार जमा‎

जालना‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सक्तवसुली संचालनालयाने‎ (ईडी) जप्तीची कारवाई केलेल्या‎ जालना सहकारी साखर‎ कारखान्याची जमीन जालना -‎ नांदेड या प्रस्तावित असलेल्या‎ समृध्दी महामार्गासाठी संपादित‎ केल्यास मोबदल्याची मिळणारी‎ रक्कम ईडी किंवा जिल्हाधिकारी‎ कार्यालयाकडे जमा करण्यात‎ येईल, असे आश्वासन‎ मुख्यमंत्र्यांचे पायाभूत प्रकल्प‎ सल्लागार तथा महाराष्ट्र राज्य रस्ते‎ विकास महामंडळाचे कार्यकारी‎ संचालक राधेश्याम मोपलवार‎ यांनी मंगळवारी आमदार कैलाश‎ गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखालील‎ शिष्टमंडळाला दिले.‎

मुख्यमंत्र्यांचे पायाभूत प्रकल्प‎ सल्लागार मोपलवार हे मंगळवारी‎ दुपारी जालना येथे आले असताना‎ जिल्हाधिकारी कार्यालयात‎ आमदार कैलाश गोरंट्याल यांच्या‎ नेतृत्वाखाली कारखाना बचाव‎ कृती समितीचे डॉ. संजय लाखे‎ पाटील, ज्ञानेश्वर भांदरगे, ज्ञानदेव‎ पायगव्हाणे, अंकुशराव राऊत,‎ ज्ञानेश्वर कदम, सुभाष कोळकर,‎ परसराम मोहिते, शरद देशमुख,‎ रावसाहेब पवार आदींचा समावेश‎ असलेल्या शिष्टमंडळाने राधेश्याम‎ मोपलवार यांची भेट घेऊन त्यांना‎ लेखी निवेदन देत जालना सहकारी‎ साखर कारखान्याच्या संदर्भात‎ त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली.‎

दरम्यान, नियम कायदे मोडून‎ तापडिया कन्स्ट्रक्शन या कंपनीने‎ कारखाना घेतल्यानंतर तो चालू‎ करण्यासाठी कसलीही हालचाल‎ केली नाही. तर १५ महिन्यानंतर‎ त्यानी सदर कारखाना २३५ एकर‎ जमिन मशिनरीसह अर्जुन शुगर‎ इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीला‎ विक्री केल्याचे दाखवले. सदर‎ नव्या कंपनीचे प्रवर्तक अर्जुन‎ खोतकर हे आणि मंडळी यांनी ८‎ मे.२०१२ रोजी जालना सह. साखर‎ कारखाना खरेदी केल्याचे‎ दाखवले.‎

दरम्यान, जालना सहकारी‎ साखर कारखाना खरेदी केला जो‎ की गंभीर गुन्हा असल्याचे सांगून‎ या सर्व बाबींची गांभीर्याने दखल‎ घेऊन जालना सहकारी साखर‎ कारखान्याची जमीन समृध्दी‎ महामार्गाच्या कामासाठी संपादित‎ करण्यात आली तर संपादित‎ जमिनीचा मोबदला ईडी किंवा‎ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा‎ करण्यात यावा अशी मागणी‎ आमदार कैलाश गोरंट्याल‎ यांच्यासह शिष्टमंडळातील‎ पदाधिकाऱ्यांनी या वेळी केली.‎ मोबदल्याची रक्कम ईडी किंवा‎ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा‎ करण्यात येईल, असे आश्वासन‎ या शिष्टमंडळाला दिल्याचे‎ आमदार गोरंट्याल यांनी सांगितले‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...