आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुगणेश भवनात चातुर्मास प्रवचन:धर्म या संकल्पनेने सर्वांना समाधान दिले : गौतममुनी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म नावाची ही अशी एक संकल्पना आहे की, जीने आजपावेतो जगातील कोट्यवधी लोकांना सुख, शांतता व समाधान दिले. त्यासोबतच धर्मानेच आजपर्यंतची सर्वात मोठी मनुष्यहानी केली आहे. धर्म या शब्दास अन्य कोणत्याही पाश्चात्त्य भाषेत समानार्थी शब्द नाही. इंग्रजी शब्द धर्म या भारतीय शब्दाची व्यापकता वर्णू शकत नाही. रिलिजन हा धर्म या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. सर्व धर्म समान असतात ही एक खुळचट समजूत आहे, असे मत डॉ. गौतममुनी मसा यांनी व्यक्त केले.

जालना शहरातील गुरू गणेश भवनातील तपोधामध्ये सुरू असलेल्या चातुर्मासाच्या प्रवचनात बोलत होते. यावेळी विचारपीठावर प्रवचन प्रभावक वैभवमुनीजी मसा, दर्शनप्रभाजी, गुलाबकंवरजी, हर्षिताजी आदींची उपस्थिती होती. डॉ. गौतममुनीजी म्हणाले, वेगवेगळ्या भारतीय दर्शनांमध्ये प्रसंगपरत्वे धर्म या शब्दाचा अर्थ मांडण्यात आलेला आहे. तो अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये योग्य आहे, म्हणजेच ते सर्व अर्थ योग्य आहेत असा सरळ तर्क लावता येईल. धृ म्हणजे धारण करणे असा या संस्कृत धातूचा आधार घेतला, तर ज्या विशिष्ट गुण विशेषामुळे एखाद्या वस्तूला, सजीवास त्याचे वेगळेपण प्राप्त झाले असते, त्या गुणविशेषास धर्म असे म्हणता येईल.

धर्म या शब्दाचा भाषा, संस्कृती, इतिहास, सभ्यता, समाज इत्यादीशी संबंध जोडला तर त्याचा अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये बदलतो. पण तरीही धर्म या शब्दाचा मूळ ‘अर्थ धारण करावा तो धर्म’ हाच आहे. धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती. धर्म म्हणजे अंगभूत गुणविशेष. व अशी सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती, अंगभूत गुणविशेष हे बाहेरून आणता येत नाहीत. हे मुळचेच असतात. पाणी व या वस्तूचा अंगभूत गुण - शीतलता, हवा व या वस्स्तूचा अंगभूत गुण - चंंचलता, अग्नी या वस्तूचा अंगभूत गुण - दाहकता, पाषाण वस्तूचा अंगभूत गुण - जडता असा आहे, असेही शेवटी डॉ. गौतममुनी म्हणाले. यावेळी श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे आजी- माजी पदाधिकारी, श्रावक- श्राविक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...