आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस पक्षाला काही पक्ष संपविण्यासाठी निघालेले आहेत. परंतू काँग्रेस ही धर्मनिरपेक्ष विचारसरणी असून तळा गाळातील लोकांचा पक्ष आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने डिजीटल सदस्य नोंदणी मोहीमेमध्ये जालना जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सक्रीय सहभाग नोंदवून सर्वात जास्त नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले आहे.
जालना जिल्हा आणि शहर काँगे्रस कमिटीच्या वतीने कॉग्रेस पक्ष डिजीटल सदस्य नोंदणी मोहीमेचा आढावा घेण्यासाठी शनिवार रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह जुना जालना येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते. व्यासपीठावर आमदार कैलास गोरंट्याल, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, राजेंद्र राख, कल्याण दळे, प्रा. सत्संग मुंडे, अण्णासाहेब खंदारे, ज्ञानेश्वर भांदर्गे, शेख महेमूद, अंकुश राऊत आदि उपस्थित होते. आ. गोरंट्याल म्हणाले की, जालना नगर परिषदमध्ये कॉग्रेस पक्ष एक हाती सत्ता हस्तगत करेल, यात तीळमात्र शंका नाही. शासनाने या निवडणूका ओबीसी आरक्षणासाठी लाबविलेल्या आहेत. ही ओबीसीसाठी न्यायाची बाजू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदमध्येही काँगे्रस पक्ष मोठ्या ताकदीने निवडणूकीत उतरणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता त्यांच्या विरूध्द टिकास्त्र सोडतांना म्हणाले की, कोणता निधी कोठून येतो केंद्राकडून का राज्याकडून याची ज्यांना माहिती नाही त्यांनी विकासाच्या कामा संदर्भात वायफळ बोलू नये. जालना शहरामध्ये येत्या १० दिवसामध्ये विशेष कार्यक्रम राबवून १० हजार पेक्षा जास्त कॉग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी करण्यात येईल. असे सांगीतले. प्रास्ताविक अण्णासाहेब खंदारे यांनी केले. याप्रसंगी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, दिनकर घेवंदे, शेख रऊफ परसुवाले, नंदाताई पवार, तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राणा, त्रिंबक पाबळे, निळकंठ वायाळ, लक्ष्मण म्हसलेकर, राजेश काळे, इकबाल कुरेशी, राम सावंत, अॅड. राम कुर्हाडे, सुभाष मगरे, भागवत उफाड, राजेंद्र गोरे, सुभाष कोळकर, अशोक उबाळे, शरद देशमुख, ज्ञानेश्वर कदम, अब्दुल बासेद कुरेशी, सय्यद करीम बिल्डर, फकीरा वाघ, भाऊसाहेब सोंळके, संजय भगत, अरूण मगरे, शेख शकील, अब्दुल रफिक, रहेम तांबोळी, अजीम बागवान, योगेश पाटील, संगीता कांबळे, जावेद शेख, जयसिंग राजपुत, चंद्रकांत रत्नपारखे, गणेश चांदोडे, शंकर जाधव, दिलीप मोरे, गणेश खरात, गजानन खरात, समाधान शेजुळ आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.