आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:रेशीम कोषाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा कचरेवाडीत सपत्नीक गौरव

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महारेशीम अभियानांतर्गत जालना तालुक्यातील कचरेवाडीत आयोजित रेशीम शेतकरी प्रशिक्षण व चर्चासत्रात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी विक्रमी रेशीम कोष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान केला.

जिल्हा रेशीम कार्यालय व सॉईल टु सिल्क रेशीम फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून आयोजित सदर प्र‍शिक्षण कार्यक्रमास प्रादेशिक रेशीम कार्यालय औरंगाबाद येथील उपसंचालक दिलीप हाके, आत्माच्या प्रकल्प संचालिका शीतल चव्हाण, केंद्रीय रेशीम मंडळातील शास्त्रज्ञ रामप्रकाश वर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी रेशीम शेतीतून उत्कृष्ट उत्पादन घेऊन शेतात बंगला बांधणाऱ्या बदनापूर तालुक्यातील वाल्हा येथील विजय साहेबराव शेळके, वरुडी येथील साईनाथ शिंदे, जालना तालुक्यातील कचरेवाडी येथील राजेंद्र कचरे, खरपुडीतील कैलास दत्तात्रय शेजुळ व घनसावंगी तालुक्यातील भानुसे बोरगाव येथील सिद्धेश्वर भानुसे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच गणेश दाते यांचा जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांच्या हस्ते जिल्ह्यातील दुसरा ऑरेंज कॅप देऊन सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...