आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ञास:तळणीतील पंपावर पेट्रोल, डिझेलचा कायम ठणठणाट; खासगी ठिकाणावरुन ग्राहकांची लूट

तळणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या तळणी येथे एकमेव असलेल्या पेट्रोल पंपांवर नेहमीच पेट्रोल डिझेलचा तुटवडा असल्याने ग्राहकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोलपंप चालकाकडून हे नित्याचेच झाल आहे. विशेष म्हणजे हा पंप तळणी गावापासुन दोन किलोमिटर असुन पेट्रोल नसले की विनाकारणचा जाणा येण्याचा ञास सहन करावा लागत आहे. पंपावर पेट्रोल नसल्यावर खासगी ठिकाणावरुन शिल्लक पैसे देऊन पेट्रोल विकत घ्यावे लागते आहे.

तळणी परिसरात जवळपास पंधरा ते वीस गावे आहेत. रोज तळणी येथे या गावातील लोकांची मोठी ये जा सुरु असते. तळणी येथे पेट्रोल उपलब्ध नसले की विदर्भातील लोणार येथे गेल्याशिवाय पर्याय नाही. पेट्रोल डिझेल हे अत्यावश्यक सेवेत येते तरीही पंपचालक याकडे सतत दुर्लक्ष करीत आहे. मागील काही दिवसामध्ये पेट्रोल नसल्याने पंपावर ग्राहकांच्या सोबत कुरबरी झाल्या होत्या. शेगाव पंढरपूर मार्ग झाल्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. त्यांनाही कित्येक वेळा डिझेल मिळत नाही. तसेच हा पंप राञीच्या वेळी पूर्णपणे बंद असतो. सकाळी पंप चालू होईपर्यंत वाहनचालकाना वाट पहावी लागते. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. मागील आठवड्यात डिझेल अभावी शेतीसह अन्य कामे खोळंबली असल्याने शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीला ब्रेक बसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तळणी येथील पंपावर डिझेल पेट्रोल नसणे हे नित्याचे झाले आहे. लोणारला जाणे परवडत नाही. संबंधितांनी लक्ष देऊन पंपचालकावर कारवाई करण्याची मागणी वाहनचालक आकाश जाधव यांनी केली आहे. तर सध्या शेतीतील कामे यंत्राच्या सहाय्याने करावे लागत असून गेल्या पंधरा दिवसापासून मंठा, मेहकर आणि वाटूर या ठिकाणावरून डिझेल आणल्याचे भगिरथसिंह चंदेल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...