आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्याच्या विकास आराखडा तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष कामांच्या अंमलबजावणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा नियोजन भवनचे बांधकाम पूर्ण झाले असून आता फर्निचर, विद्युत जोडणीसह इतर कामे हाती घेतली जाणार आहे. यासाठी दीड कोटी रुपये खर्चाची निविदा काढून येत्या सहा महिन्यांत सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
नांदेडच्या धर्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयालगत बांधल्या जाणाऱ्या नियोजन भवनच्या धर्तीवर या दोन मजली इमारतीत जिल्हा नियोजन विकास समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी तथा समितीचे सचिव यांचे दालन, साधारणत: ३५० ते ४०० आसनक्षमतेचे भव्य सभागृह, प्रशासकीय विभाग राहणार आहे. याठिकाणी जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठका, केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या विविध समित्यांच्या बैठका, प्रशिक्षण घेता येणार आहे. या नियोजन भवनमधून जिल्ह्यात होणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा घेऊन मंजूर झालेली कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करता येणार आहे.
नांदेडच्या धर्तीवर भवनचे काम सुरू नांदेड येथील नियोजन भवनच्या धर्तीवर जालन्यात काम सुरू असून आतापर्यंत ८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. यात दोन मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून फर्निचर व विद्युतीकरण बाकी आहे. यासाठी नुकताच निधी प्राप्त झाला असून निविदा काढून कामे दिली जाणार आहे. येत्या सहा महिन्यात नियोजन भवन पूर्ण होईल, यादृष्टीने काम केले जात आहे.- चंद्रशेखर नागरे, उपअभियंता, बांधकाम विभाग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.