आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठराव:आरोपींचे वकीलपत्र दाखल करू नये; वकील संघाचा ठराव

कुंभार पिंपळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जांबसमर्थ येथे समर्थांच्या देव्हाऱ्यातील झालेल्या मूर्ती चोरी प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात घनसावंगी वकील संघाच्या वतीने आरोपींचे कोणत्याही वकील सदस्यांनी वकीलपत्र दाखल करून घेऊ नये असा ठराव घेतला आहे.

घनसावंगी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. आर. धायतडक यांच्या अध्यक्षतेखाली घनसावंगी न्यायालयातील कोणत्याही वकील सदस्यांनी आरोपींचे वकीलपत्र दाखल करू नये अशा प्रकारचा ठराव अ‍ॅड. शामसुंदर तांगडे यांनी सूचक म्हणून ठराव मांडला होता. त्यास अ‍ॅड.गजेंद्र तांगडे यांच्यासह सर्व सदस्यांनी सर्व संमतीने पाठींबा दर्शविला. यावेळी अ‍ॅड.शामसुंदर तांगडे, अ‍ॅड.व्ही.ए. तौर, अ‍ॅड.जी. जी. तांगडे, अ‍ॅड. वागदरे, अ‍ॅड. के. आर. कुलकर्णी, अ‍ॅड. एस. जी. देवडे, अ‍ॅड. ए. के. माने, अ‍ॅड. एस. व्ही. चव्हाण आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...