आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय बुलडाणा येथील द्वितीय वर्ष शिक्षण घेणाऱ्या १४ विद्यार्थ्यांची समुदाय विकास विशेषीकरणच्या क्षेत्रकार्य अंतर्गत एक्सपोजर व्हीजिट जालना येथील सेंटर फॉर एग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट अर्थात कार्ड संस्थेस प्राचार्य डॉक्टर नंदू राम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी भेट दिली.
या क्षेत्रभेटी दरम्यान कार्डचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. रामदास निहाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते वेळी आवाहन केले की, जोपर्यंत आपल्या देशातील समाजाच्या शेवटच्या घटकातील व्यक्तीचा कुटुंबाचा विकास होत नाही. तोपर्यंत आपल्या देशान विकास केला असे म्हणू शकणार नाही. त्यामुळे आपण शेवटच्या घटकातील व्यक्तींना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा तरच देशाची प्रगती साधता येईल असे प्रतिपादन केले. सामाजिक सेवा करण्यासाठी विशेष अभ्यासक्रम राबवल्या जात असून यातून विद्यार्थ्यांना क्षेत्र भेटी सारखे अनुभव देणारे उपक्रम राबवले जाते.
कार्ड चे सचिव पुष्कराज तायडे यांनी कार्ड संस्थेची स्थापना, उद्देश, ध्येय आणि साध्य पूर्ण करण्यासाठी हाती घेतलेले विविध सामाजिक उपक्रम, कृषी व ग्रामीण विकासाचे प्रकल्प याबाबतची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी संस्था चालवत असताना येणाऱ्या अडचणी पुढील नियोजन व संस्थेच्या कार्याची पद्धती याबद्दल प्रश्न विचारून शंकाचे समाधान करून घेतले. एम.एस.डब्ल्यू चे विद्यार्थी विशाल गोरे, वैभव राजपूत,सीमा जाधव, वनमाला गाढवे, ऋतिक पवार,सुजाता गवई, किरण वाडेकर, अजय सुरडकर, प्रकाश गुळवे, जितेंद्र महाजन अभिलाषा काकड, यमुना वाडेकर, मयूर साळीक, विशाल आराक आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.