आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:सासूचा खून करणाऱ्या जावयाला  कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सासूचा खून करणाऱ्या आरोपी जावयाला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विजय किशन धिल्लोड (३५, भीमनगर, भावसिंगपुरा, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. ही शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी सुनावली आहे.

पतीसोबत नेहमी भांडण होत होते म्हणून मुलगी मुलासह माहेरी राहायला आली होती. दरम्यान, यामुळे आरोपी विजय धिल्लोड याने पत्नीला का पाठवत नाही, असे म्हणून मारहाण केली होती. यात सासूचा मृत्यू झाला होता. ही घटना जालना शहरात २२ डिसेंबर २०११ रोजी घडली होती. या प्रकरणात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला शोधून आणून नंतर काही दिवसांनी चार्जशीट दाखल केली होती. या गुन्ह्यात आरोपी असलेल्या विजय धिल्लोड यास जन्मठेपेची शिक्षा व पाच हजारांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...