आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा यांनी व्यक्त केले मत:सध्याचा विकास म्हणजे 10% लोकांची दिवाळी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनावश्यक सिंचन, वीज आणि महामार्गाचे प्रकल्प उभे करून सरकार निव्वळ संख्यात्मक वृद्धी करत आहे. हा विनाशकारी विकास असून यातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे सध्या देशात १० टक्के लोकांची दिवाळी तर ९० टक्के लोकांचा शिमगा सुरू आहे. त्यामुळे सध्या असलेले विकासाचे जुने मॉडेल टाकून देत पर्यावरण आणि मानव केंद्रित विकासाचे शाश्वत मॉडेल स्वीकारणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञ डॉ. एच.एम.देसरडा यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

४५ वी महाराष्ट्र अर्थशास्त्र परिषद सध्या जालना येथे सुरू आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सहभागी अर्थतज्ज्ञांनी विविध विषयावर प्रबंध सादर केले. यावेळी डॉ. देसरडा म्हणाले की, देशातील ९० कोटी आणि महाराष्ट्रातील १० कोटी जनता अभावग्रस्त जीवन जगत आहे. या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या गरजासुद्धा सरकारकडून पूर्ण केल्या जात नाही. स्वतंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही ७५ टक्के लोकअभावग्रस्त जीवन जगत असतील तर विकासाच्या सध्या सुरू असलेल्या मॉडेलला टाकून देणे आवश्यक असल्याचे यावेळी मत त्यांनी मांडले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करा मोठे महामार्ग, सिंचन प्रकल्प यांचा सर्वसामान्य जनतेला उपयोग नाही. तो विकास फक्त वाढ दर्शवितो. त्यामुळे अणुऊर्जेऐवजी सौर ऊर्जेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यासोबतच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट केली तर त्यातून पर्यावरणाचे रक्षण होईल. सेंद्रिय शेतीलाही प्राधान्य देणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीमुळे रोजगारात वाढ होईल, असे डॉ. देसरडा म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...