आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास:बडी सडकची दैना संपणार; पावणेसहा कोटीतून विकास

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहराचे वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दधीची चौक रस्ता अर्थात बडी सडकसाठी ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नाने हा निधी मंजूर करण्यात आला असुन या रस्त्याचे आता काँक्रिटीकरण केले जाणार आहे.

२०१४ ते २०१९ या कालावधीत भाजपचे सरकार सत्तेवर असताना ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना शहरातील विविध सिमेंट रस्त्यासाठी ७० कोटी मंजूर केले होते. या मंजूर निधीतून शहरातील अनेक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे. जालना शहराला सिमेंट रस्ते रावसाहेब पाटील दानवे यांनी दाखविले. अगोदरच्या काळामध्ये जालना शहरातील जवळपास सर्वच रस्ते खराब झाले होते, नागरिकांना याचा खूप त्रास होत होता, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना मणक्याचा त्रास सुरू झाला होता, परंतु ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी मंजूर करून आणलेल्या ७० कोटी निधीमधून शहरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले.

दरम्यानच्या काळात २०१९ मध्ये भाजपा सत्तेच्या बाहेर राहिल्यामुळे शहरातील महत्त्वाचा आणि जालना शहराचे वैभव असणारा “बडीसडक” या नावाने ओळखला जाणाऱ्या या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याचे राहून गेले होते. आघाडी शासनाच्या काळातही या महत्त्वाच्या रस्त्यासाठी निधी प्राप्त न झाल्यामुळे सदर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती, रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडली होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिला नव्हता. दरम्यानच्या काळामध्ये महाविकास आघाडी शासनाची सत्ता जाऊन भाजपा+सेना (शिंदेगट) चे सरकार सत्तेत आले आणि या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यामुळे या भागातील नागरीकांनी या रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री दानवे यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दधीची चौक (मुर्गी तलाव) पर्यंतचा रस्ता सिमेंटीकरण करण्याचे राहून गेला, आघाडी शासनाच्या काळातही या महत्त्वाच्या रस्त्यासाठी निधी प्राप्त न झाल्यामुळे सदर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती, रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडली होती, हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिला नव्हता आणि शहरातील प्रत्येक नागरिकाला या रस्त्यावरून जावे लागत असे एवढा हा रस्ता महत्त्वाचा होता. गणेशोत्सव काळातही या रस्त्याचे मोठे महत्व आहे.

दानवेंनी सोडवला सलग दुसरा प्रश्न
भाजपा-सेना (शिंदेगट) चे सरकार सत्तेत येताच रावसाहेब पाटील दानवे यांनी कन्हैयानगर समोरील रस्त्यासाठी वन विभागातील सर्व अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी, जालना यांच्या कॅबिनमध्ये बैठक घेतली आणि तात्काळ सदर रस्त्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले व प्रत्यक्षात काम सुरूही झाले आहे. त्यापाठोपाठ बडीसडक साठी आता ५ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करून आणले.

भास्कर दानवे यांनी घेतली बैठक
मंत्री दानवे यांनी भास्कर दानवे यांना त्या परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन समस्या जाणून घेण्याचे सांगितले. त्यानुसार भास्कर दानवे यांनी मनीष बगडिया, चेतन देसरडा व विजय कामड यांच्यासह धानवाला यांच्या घरी परिसरातील नागरिकांच्या बैठका घेऊन समस्या जाणून घेतल्या. बैठकीत सर्व नागरिकांनी “बडीसडक” हा रस्ता खूपच खराब झाला असून हा रस्ता चांगल्या पद्धतीने भूमिगत नालीसह बनवावा अशी विनंती केली. या बैठकीचा अहवाल भास्कर दानवे यांनी केंद्रीय मंत्री दानवे यांना कळविला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या रस्त्यासाठी ५ कोटी ७५ लाख रुपये मंजूर केल्याची माहिती मंत्री दानवे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...