आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणाच्या गलथान कारभार:वीजपुरवठा सुरळीत होत नाही ताेपर्यंत बिल न भरण्याचा धावडा ग्रामस्थांचा निर्णय

धावडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील धावडा येथील महावितरणाच्या गलथान कारभारामुळे मागील एक महिन्यापासून तीन रोहित्रावरील आठ गट्टू जळाल्याने अर्धे गाव अंधारात आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होऊन गट्टू जळत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गुरुवारी महावितरणचे कर्मचारी घरगुती विज बिलाची वसुली करण्यासाठी गावात आले असता संतप्त ग्रामस्थांनी जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करीत नाहीत तोपर्यंत बिल न भरणार नाही, असा पावित्रा घेत वसुलीपासून राेखले.

वारंवार तांेंडी आणि लेखी निवेदन देऊनही कुणीच गांभीर्याने घेत नाहीत. जोपर्यंत नवीन गट्टू आणून विज पुरवठा सुरळीत करण्यात येत नाही तोपर्यंत वीज बिल वसुली आणि रिडिंगही घेऊ दिली जाणार नाही, असा इशारा दिला. यावेळी सरपंच विलास बोराडे, उपसरपंच एकबाल पठाण, बेलाप्पा पिसोळे, दिनेश देवकर, अमोल देशमुख, डि. ए. घुले, श्रीकृष्ण शेजूळ, रामेश्वर धनवई, स.अझर, पवन धनवई आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...