आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्म:पुण्याची कर्मे धर्मरूपी रूपातील भगवंताच्या हाती : जैस्वाल महाराज

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवाची पाप पुण्य आदी कर्मे ही धर्ममुर्ती रुपातील भगवंताच्या हाती असल्याचे संजय महाराज जैस्वाल यांनी सांगितले. अंबड येथील नृसिंह जन्मोत्सवात किर्तनाचे चौथे पुष्प गुंफताना त्यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या चार चरणाच्या अभंगातून निरुपन केले.

संत तुकोबांच्या जीवनातील अनेक संकटे ही पुर्वसंचीत मानताना त्यांनी भगवंताला आळवणी केली की मी एवढे सर्व चांगले कामकरीत असताना संसारात मला दु:खच का पत्नी वियोगासह धंदयात अपयश त्यामुळे दारिद्रय अशा संकटातून व पापकर्मातून भगवंता तूच मला वाचवू शकतो. भक्तीचा महिमा आपणास ज्ञानेश्वरी, गाथा आदी संतसाहित्यातुन प्रकट होतो अशा प्रकारे ब्रह्मरुपी लीन झालेले तुकोबा आपल्या दुस्तर कर्मापासून मुक्ती मागतात. संचीत भोग भोगने म्हणजेच कर्म. त्या कर्मानुसार येणारे भोग भोगावेच लागतात.

चांगल्या कर्माचे उत्तम फळ व वाईट कर्माचे वाईट फळ मिळने यालाच प्रारब्ध म्हणावे. यावर एकच उपाय म्हणजे संत सांगतात तो मार्ग अनुसरने होय. भगवंत पुण्यादी कर्माची धर्ममुर्ती, जगाचा दाता आहे तसेच विश्वाला सुखदुखादी कर्मे देणाराही दातारा आहेस. वारकरी संप्रदायाचे वर्णन करताना हा संप्रदाय जगात का श्रेष्ठ आहे हे सांगताना याचा पाया ज्ञानोबांनी रचला व नाथमाऊली खांब झाले आणि तुकोबा या इमारतीचे कळस झाल्यामुळे या सर्व मजबुत आधाररुपी संतश्रेष्ठांमुळे हा संप्रदाय श्रेष्ठ झाला आहे. त्यामुळे तो सुर्याच्या तेजाप्रमाणे तळपणारा आहे. अशा या संतत्व प्राप्त झाले असल्याचे महाराजांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...