आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड तालुक्यात वडीकाळ्या येथे मराठा आरक्षणासाठी ३५ युवकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्याला संपूर्ण गावाने पाठिंबा दिला. रविवारपासून सुरू झालेल्या या उपोषणात सोमवारी दुपारी एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली. त्यांच्यावर उपोषणस्थळीच उपचार करण्यात आले. दरम्यान, मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ सोमवारी वडीकाळ्या येथे येणार असल्याची माहिती होती. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत असे कोणतेही शिष्टमंडळ गावात आले नव्हते.
उपोषणासाठी बसलेले शरद रक्ताटे यांची तब्येत सोमवारी दुपारी खालावली. माहिती मिळाल्यानंतर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर उपोषणस्थळी दाखल झाले आणि त्यांनी रक्ताटे यांच्यावर तेथेच उपचार सुरू केले. पहिल्या दिवशी २५ युवक उपोषणाला बसले होते. सोमवारी आणखी ११ युवक उपोषणाला बसले आहेत. सोमवारी दुपारी मंत्रिमंडळाचे एक शिष्टमंडळ वडीकाळ्या गावात येऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करणार होते, असे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे उपोषणकर्ते दिवसभर शिष्टमंडळाची वाट पाहत बसले. परंतु कोणतेही शिष्टमंडळ वडीकाळ्या गावात आले नाही. दरम्यान, आरक्षणाचा निर्णय जाहीर होईपर्यंत मागे हटणार नाही आणि उपोषण सुरूच राहील, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
...तर सरकार जबाबदार
^वडीकाळ्या गावातील एकाही उपोषणकर्त्याच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास सरकारला याची किंमत मोजावीच लागेल. सकल मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्यास सरकारने भाग पाडू नये. ही मागणी तातडीने मंजूर करावी.
- मनोज जरांगे पाटील, उपोषणकर्ते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.