आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:रासयोतून होतो मन, मेंदू अन् मनगटाचा विकास; डॉ. लक्ष्मीकांत शिंदे यांचे प्रतिपादन

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय ‌सेवा योजनेतून मन, मेंदू व मनगट यांचा विकास होत असून, युवकांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय ‌सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात डॉ. लक्ष्मीकांत शिंदे यांनी केले.

भाटेपुरी येथे जेईएस महाविद्यालय जालनाच्या राष्ट्रीय ‌सेवा योजना विभागातर्फे जल व वृक्ष संवर्धनातून ग्रामविकास यावर सातदिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ लक्ष्मीकांत शिंदे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज होते. व्यासपिठावर उपप्राचार्य प्रवीण बाफना, सरपंच जयश्री गावडे, सत्यनारायण गावडे, माजी पंचायत समिती सदस्य संजय आटोळे, मुख्याध्यापक मुळे‌, डॉ. सूर्यकांत चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ लक्ष्मीकांत शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय ‌सेवा योजनेतून युवकांचा सार्वंगीण विकास होतो. मन, मेंदू व मनगट यांचा विकास होऊन युवकांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होते, म्हणूनच विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले जाते, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज यांनी राष्ट्रीय ‌सेवा योजनेचे महत्त्व सांगून, युवकांची जडण-घडण येथून होते. आदर्श नागरिक घडतात असेही डॉ. बजाज यांनी सांगितले.

प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गणेश रोकडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मनोज महेर यांनी आभार मानले. प्रा. करण सातुरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...