आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व वाढती महागाई यामुळे अडचणीत आलेल्या सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची जालना तालुक्यातून शेतकरी संवाद दिंडी काढणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी दिली.
जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या प्रमाणात शेतकर्यांना मदत मात्र मिळालेली नाही. सातत्याने वाढणारे जीवनाश्यक वस्तुंचे भाव व शेतकर्यांच्या शेत मालाचे उतरलेले भाव यामुळे सामान्यशेतकरी व नागरिकांचे जीवन अत्यंत जिकीरीचे झालेले आहे. अशा परिस्थितीत सामान्य नागरिक व शेतकरी यांची व्यथा जाणून त्यांना धीर देण्यासाठी नेर येथील श्रीवटेश्वर संस्थान येथून १४ नोव्हेबरपासून शेतकरी दिंडीस प्रारंभ होणार आहे.
या शेतकरी दिंडीत शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, डॉ. हिकमत उढाण, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांची उपस्थिती राहणार आहे. या शेतकरी संवाद दिंडीत मोठ्या संख्येने नागरिक, शेतकरी, शिवसैनिक व पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी दिंडीचे आयोजक जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी केले आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांची तुरुंगातून मुक्तता झाल्याने सामान्य नागरिक व अडचणीतील शेतकरी यांना न्याय मिळून देण्यासाठी शिवसेनेचा आवाज पुन्हा बुलंद होणार असल्याचे जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.