आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरीक्षक:जिल्ह्याला मिळाले दोन नवे निरीक्षक

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विशेष पोलिस महानिरीक्षकांनी औरंगाबाद परिक्षेत्रातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या बदल्या बुधवारी करण्यात आल्या आहेत. यात वादग्रस्त पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांची बीडला बदली करण्यात आली आहे.

बीडहून पीआय भागवत फुंदे, सिद्धार्थ माने यांची जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. तर कदीम ठाण्यातील निशा बनसोड व मौजपुरी पोलिस ठाण्याचे विलास मोरे यांची औरंगाबाद ग्रामीणमध्ये बदली झाली आहे. तर चैनसिंग गुसिंगे, बालाजी वैद्य, प्रतापसिंग बहुरे, अर्चना पाटील, संजय अहिरे, जगदीश पवार यांची औरंगाबाद ग्रामीणमधून जालना येथे बदली झाली आहे. तर पोउपनि. विलास गुसिंगे यांची औरंगाबाद ग्रामीण येथून जालना येथे बदली झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...