आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली; आष्टी परिसरात खरीप पेरणीचे संकट

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगदी पिक समजल्या जाणाऱ्या ऊसाने या वर्षी आष्टी परीसरातील शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली असून ऊसाचे पिक अतिरिक्त झाल्याने त्यातच कारखान्याकडून वेळेत तोड न झाल्याने अव्वाच्या सव्वा खर्च करून आपला ऊस मालक तोड करून कारखान्याला घालावा लागला असल्याने शेतकरी कंगाल झाले असून आता खरीप हंगामात पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना सताऊ लागला आहे.

गेल्या तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण वाढले असल्याने त्यातच पैठण येथील येणाऱ्या डाव्या कालव्यातून मुबलक प्रमाणात पाणी भेटत असल्याने या भागातील व गोदावरी नदीच्या काठच्या गावात मोठ्या प्रमाणात नगदी पिक असलेल्या ऊसाची लागवड झालेली आहे. परतुर येथील बागेश्वरी व कुंभार पिंपळगाव येथील समृद्धी या दोन कारखान्या कडे हजारो रुपये भरुन शेतकरी सभासद झाले व ऊसाची लागवड केली मात्र मात्र कुठे पंधरा तर कुठे सोळा महिने उलटुन ही कारखान्या कडे चकरा मारुण ही ऊस न गेल्याने गेल्या दोन महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी स्वत मालक तोड करून आपला ऊस कारखान्याला घातला.

यासाठी एकरी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये शेतकऱ्यांना खर्च करावा लागला. संपूर्ण ऊन्हात चार महिने ऊस करपल्याने उत्पादनही घटले. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून हौसेने केलेल्या पिकाची माती झाली आहे. ऊसाला केलेला खर्च निघाला नसुन शेतकऱ्यांना तो शेतातून बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अनेकांनी आता ऊसाच्या शेतात मशागत करायला सुरुवात केली असली तरी पेरणी साठी पैसा नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने ताबडतोब आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...