आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहसुल विभाग प्रशासनाचा कणा आहे. महसुल विभागात काम करत असताना प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करुन शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.महसुल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ब्रिटीश काळापासून सुरु झालेला हा महसुल विभाग आहे. ब्रिटीश काळामध्ये केवळ महसुल जमा करणारा हा विभाग होता.
परंतू महसुल विभागाच्या कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला असुन केवळ महसुल जमा करणेच नव्हे तर शासनाच्या अनेकविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी महसुल विभागावर सोपविण्यात आलेली आहे. प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांने पदापेक्षा प्रामाणिकतेला महत्व देत सेवाभाव वृत्तीने काम करावे. गत दोन वर्षात कोव्हीडचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. या परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाबरोबर महसुल विभागाने अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली. कोव्हीड रुग्णालयाची उभारणी, विलगीकरण कक्ष, ऑक्सिजनचा पुरवठा यासह इतर आवश्यक त्या सर्व सुविधा सर्वसामान्यांना पुरविण्यामध्ये महसुल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू न देता देवदूत म्हणून काम केले. अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची जशी शासनाची अपेक्षा असते तशाच कर्मचाऱ्यांच्याही शासनाकडून, प्रशासनाकडून अपेक्षा असतात. आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्यांची सेवा करण्यामध्ये व्यतीत करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठीही आपण सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे म्हणाले, महसुल व पोलीस प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत. महसुल व पोलिस विभागातील प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित व समन्वयाने काम करत जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी केले. सुत्रसंचलन संपदा कुलकर्णी यांनी तर संतोष अनर्थे यांनी आभार मानले.
सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे
कोव्हीड काळामध्ये आरोग्य विभाग, महसुल, पोलीस, जिल्हा परिषदेमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे मोठ्या संकटाचा सामना करण्यात यश प्राप्त झाले. प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने सेवाभाववृत्तीने समाजातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.