आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रब्बी पिके जोमात:पंधरवड्यापासून वाढला  थंडीचा जोर, पोषक वातावरण

वालसावंगी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरात रब्बी हंगामात लागवड केलेला गहू , हरभरा पीक जोमात आल्याचे दिसून येत आहे.गेल्या महिन्यापूर्वी खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्यानंतरही बळीराजा दुःख उराशी कवटाळत न बसता नव्या जोमाने रब्बी च्या पेरणीत गुतंला आहे.

खरिपाकडून निराशा मिळाल्यानंतर शेतकरी रब्बी हंगामातील गहू आणि हरबरा पिकांकडून अपेक्षा ठेवुन आता हळुहळु थंडीने चांगलाच जोर धरला असून पोषक वातावरण तयार होत असल्यामुळे पेरणी केलेली पिके थंडीमुळे पोषक वातावरणामुळे शेतशिवारात पिके डोलु लागली आहे. वालसावंगीसह, पारध,धावडा, शेलूद, लिहा , पोखर , वाढोणा,विझोरा, अन्वा, जळगाव सपकाळ या शिवारातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन तुरी सह कपाशी पिकांची लागवड केली अतिपावसाने कापुस आणि सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे या दोन्ही प्रमुख पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. मात्र, अतिपावसामुळे जलाशय विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने यंदा रब्बीत गहु आणि हरबऱ्याचा पेरा गतवर्षीच्या तुलनेत वाढल्या आहे.

आता रब्बीकडून अपेक्षा असल्याने थंडी रब्बी पिकासाठी पोषक असल्याने काही शेतकऱ्यांंनी शेती मशागत करुन पेरणीला सुरवात केली आहे. काही शेतकरी अजुनही मशागतीच्या कामात व्यस्त असले तरी अनेक शेतकऱ्यांंनी गहु, हरबरा , पेरणी आधीच आटोपली आहे. पेरणी झाल्यानंतर हळू हळू हरबरा सध्या जमिनीबाहेर निघुन कोवळी झाडे दिसत आहे. एकदंरीत हवामान असेच पोषक राहिल्यास पिकांचे उत्पादन भरघोस घेण्याची आशा शेतकरी वर्गाला लागुन आहे.

बातम्या आणखी आहेत...