आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरारी पथक तैनात:कॉपीमुक्ती अभियानाचा फज्जा; 9 परीक्षा केंद्रांवर होणार कारवाई

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेत कॉपी करण्याचे प्रकार या वर्षी जिल्ह्यातील नऊ केंद्रावर आढळून आले. १७ भरारी पथकेही तैनात करण्यात आले होते. असे असताना कॉपीचे प्रकार करणाऱ्या उपद्रवी केंद्रांवर परीक्षा मंडळाकडून कारवाईची टांगती तलवार आहे. या उपद्रवी केंद्रांचा अहवाल परीक्षा मंडळाला पाठवला जाणार आहे, असे शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी सांगितले. त्यामुळे या केंद्रांना परीक्षा बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या केंद्रांवर झाली कॉपी : शिवराज क.म.वी. पिंपळगाव कोलते तालुका भोकरदन, लोकमान्य टिळक क.म.वी. शेवली ता. जालना, जि.प. प्रशाला शेवली तालुका जालना, राजकुवर क.म.वी. वाघरूळ तालुका जालना, आदर्श ज्युनिअर कॉलेज जामखेड तालुका अंबड, जांबुवंत उच्च माध्यमिक विद्यालय रोहिलागड तालुका अंबड, सोनामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ढासला तालुका बदनापुर, जिजाऊ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेलगाव तालुका बदनापुर, सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगाव तालुका बदनापूर या केंद्रांवर यावर्षी कॉपीचे प्रकार आढळून आले आहेत.