आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचिका:गायरान आदेशाविरुद्ध शासनाने फेरविचार याचिका दाखल करावी

जालना12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याबाबत सर्वोच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्य शासनाने अध्यादेश काढून प्रत्येक जिल्हानिहाय अतिक्रमणे काढण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.

यामुळे पिढ्यानपिढ्या अतिक्रमित असलेले गायरानधारक भयभीत झाले असून राज्य शासनाने या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी लहुजी शक्ती सेनेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. गायनधारकांच्या मुळावर उठलेला आदेश आणि अतिक्रमित धारकांना दिलासा मिळावा.

याकरिता लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णू कसबे व युवक प्रदेशाध्यक्ष सचिन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र संघटक संतोष अहिरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.दिनेश खरात, मुंबई प्रदेश सचिव बाळू जाधव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव पंडित, सूर्यवंशी, भोसले, रोहित खलसे ,जालना जिल्हाध्यक्ष विनोद आठवे, अरुण हिवाळे, संतोष निकाळजे, अंबादास थोरात आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...