आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारुग्णालयातील औषधी दुकानातूनच रुग्णांनी औषधांची खरेदी करावी अशी सक्ती नाही, रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधांची खरेदी करु शकतात,असा महत्वपूर्ण व रुग्णांच्या हिताचा निर्णय शासनाने घेतला आहे.तसेच अशा आशयाचा फलक ठळकपणे संबंधित रुग्णालयांनी रुग्णांना दिसतील अशा दर्शनीय भागात प्रदर्शित करावा,असे आदेश काढले आहेत. शासनाच्या हा निर्णय स्वागतार्ह असून डॉक्टर व रुग्णालयांनी तत्काळ याची अंमलबजावणी करावी.
येत्या २६ जानेवारीपर्यंत जर या निर्णयाची अंमलबजावणी डॉक्टर व रुग्णालयांनी केली नाही तर आरोग्य मित्र महाराष्ट्रच्या वतीने सदरील फलक लावण्यात येतील,असा इशारा आरोग्य मित्र महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष चंदुलाल बियाणी, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.प्रभू गोरे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना पाठवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.