आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लायन्स क्लब:परतूर लायन्स क्लबची धुरा डॉ. चव्हाण यांच्या खांद्यावर

परतूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायिक डॉ. संदीप चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा रविवारी सायंकाळी शहरात पार पडला यावेळी इन्स्टॉलिंग ऑफिसर अतूल लड्डा, इंडक्शन ऑफिसर सुनील बियाणी, एमजेएफ दर्शन कमळकर, झोन चेअर पर्सन एमजेएफ दत्तात्रय नंद आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. लायन्स क्लबच्या सचिवपदी प्रशांत राखे यांची तर कोषाध्यक्षपदी बबनराव उन्मुखे यांची निवड करण्यात आली आहे. झोन चेअर पर्सन दत्तात्रय नंद यांनी नूतन सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मावळत्या अध्यक्षा संजीवनी खालापुरे यांनी मागील वर्षाचा कार्यअहवाल यावेळी उपस्थित वारिष्ठांकडे सादर केला.

सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या परतूर लायन्स क्लबने परतूरकरांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. निस्वार्थ भावनेने सेववृत्ती जोपासत लायन्स क्लबचे कार्य सुरू आहे. अनेक सामाजिक उपक्रमात लायन्सक्लबचा आदर्श घेऊन समाजातील लोक सेवा करण्यासाठी पुढे येत आहेत. आगामी काळात सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लायन्स क्लबला अधिक समजाभिमुख करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी प्रतिक्रिया नूतन अध्यक्ष डॉ. संदीप चव्हाण यांनी दिली आहे.

पदग्रहण सोहळ्याला तारा उन्मूखे, शिल्पा होलाणी, महेश होलाणी, विश्वंभर बहिवाळ, संदीप दाभाडे यांच्यासह इतर लायन्स सदस्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...