आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजल जीवन मिशनच्या माध्यमातून ७४ गावांतील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमस्वरूपी खाली उतरवणार असल्याचे आमदार संतोष दानवे यांनी सांगितले. आसई, कोल्हापूर, येवता, चापनेर, धोंडखेडा, बेलोरा या गावंात १५ कोटी ६४ लाख रुपयांच्या निधीतून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनांचे रविवारी आ. दानवे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
जाफराबाद तालुक्यातील माहोरा जिल्हा परिषद सर्कल मधे केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांच्या पुढाकारातून मंजूर करण्यात आलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामांचे आमदार संतोष दानवे यांनी भूमीपूजन करून कोल्हापूर येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आसई येथे १ कोटी ५ लाख, कोल्हापुर येथे १ कोटी ११ लाख, येवता येथे १ कोटी ५ लाख, चापनेर १ कोटी ४ लाख, धोंडखेडा येथे ७५ लाख, बेलोरा येथे ५६ लाख या सर्व गावांमध्ये एकूण १५ कोटी ६४ लाख रूपये निधीतून जलजीवन पाणीपुरवठा कामांचे उटघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार दानवे म्हणाले की, पाण्याची गंभीर समस्या सोडवण्यासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून लवकरच कामे सुरू होवुन पाणी प्रश्न कायमचा मिटण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून येणाऱ्या काळात माहोरा सर्कल मधील सर्व गावांचा विकास करण्यासाठी विविध योजना आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष लोखंडे, माजी कृषी ऊत्पन्न बाजार समिती सभापती भाऊसाहेब जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश चव्हाण, रामेश्वर कारखानाचे चेरअमन विजय नाना परिहार, माजी सभापती दगडुबा गोरे, माजी सभापती साहेबराव कानडजे, सरपंच डॉ. रविंद्र कासोद, माजी सभापती चंद्रकात चौथमोल, गोविंद पंडित, गजानन लहाने, राजेश म्हस्के, भास्कर जाधव आदींची कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर येथे सर्कमधील भाजपा पदाधिकारी यांच्यासह संरपच कोल्हापुर अंजनाबाई जाधव तसेच ग्रामसंसद सदस्य महिला मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी हजेरी लावली. दरम्यान, ७४ गावांतील पाणीटंचाई कायमची हटवण्यासाठी आमदार संतोष दानवे यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे.
पिंपळगाव कड येथे ३३ केव्ही उपकेंद्रामुळे वीजसेवा होणार सुरळीत
परिसरातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत मिळावा यासाठी माहोरा सर्कल मधील पिंपळगाव कड येथे नवीन ३३ केव्ही क्षमतेचे वितरण केंद्र उभारून प्रत्येक गावात गावठाण फीडर करून वीज, पाणी आणि रस्ते समस्या येत्या काळात मार्गी लावल्या जाणार आहेत. यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार संतोष दानवे यांनी संागितले. मागील तीन वर्षापासून पाऊस अधिक प्रमाणात होत असल्याने शेतकऱ्यांना खरीप, रब्बीसह उन्हाळी पिके घेण्याची संधी उपलब्ध हाेत आहे. ही बाब लक्षात घेता वीज वेळेत तसेच सुरळीत मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा आधार होईल, असेही आमदार दानवे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.