आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवाचा याेग साधून या वर्षी एप्रिल महिन्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ७५ मिशन अमृत सरोवरे तयार करण्याचे आवाहन “मन की बात’ या कार्यक्रमातून केले. दरम्यान, राज्यात ३,२६१ तर टंचाईग्रस्त मराठवाड्यात ६२० सरोवर होत आहेत. काही ठिकाणी हे मिशन अमृत सरोवरे तयारही झाली आहेत. १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत हे मिशन करण्याचे उद्दिष्ट आहे. सरोवरे तयार करण्यात मराठवाड्यातून उस्मानाबाद, बीडमध्ये सर्वाधिक तर नांदेड, परभणी हे जिल्हे मात्र तळाला असल्याची माहिती समोर आली आहे.
नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार, देशातील २१ जिल्ह्यांतील १० कोटी नागरिक पाणीटंचाईचा सामना करत आहेत. ही टंचाई मिटवण्यासाठी पाणी अडवणे, जलस्तर वाढवणे, नद्यांचे पुनरुज्जीवन अादी बाबींची गरज आहे. या अनुषंगाने देशात ५० हजारपेक्षा जास्त जलाशये तयार करण्याचा मानस भारत सरकारने ठेवला आहे. या अनुषंगाने प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यावर काम सुरू झालेले आहे. दरम्यान, या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अमृत सरोवर तयार करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारकडून ठेवण्यात आले आहे. या योजनेत जुन्या तलाव खोदले जाणार आहेत. ज्या तलावांच्या ओढ्यांचे पाणी वाहून जात असेल ते पाणी रोखण्यासाठी खोदकाम केले जाणार आहे. शिवाय तलावांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जात आहे. जालन्यात ७५ अमृत सरोवरे होत असून, ३० ठिकाणी कामांना सुरुवात झाली आहे. तर परतूर, भोकरदन २ तर बदनापूर तालुक्यात १ अशा पाच ठिकाणी ही अमृत सरोवरे तयारही झाली आहेत. मराठवाड्यात सरोवरे तयार करण्यात बीड आघाडीवर आहे, तर नांदेड, परभणी सर्वात खाली आहे. ही सरोवरे झाल्यानंतर पाणी थांबण्यासह पाणीटंचाई दूर करण्यासाठी मदत होणार आहे. मराठवाड्याला विशेषकरून पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानुसार सुरू केलेल्या सरोवरांचा मराठवाड्याला चांगला फायदा होणार आहे. परंतु, ही सरोवरे तयार होत असताना दर्जेदार पद्धतीने व्हावीत, कागदोपत्री ही सरोवरे तयार झाल्यास त्याचे दुष्परिणामही मोठ्या प्रमाणात राहणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत सरोवरांची माहिती पोर्टलवर अपलोड करावी लागत असल्याचे सांगण्यात आले आहे.
असे अाहे मिशन अमृत सरोवर जिल्हा साइट प्रगती पूर्ण औरंगाबाद १०२ २२ ०२ जालना ७५ ३० ०५ उस्मानाबाद ८० २३ २६ परभणी ७९ २२ ०० बीड ११० ३९ १५ लातूर ९३ ४९ ०५ नांदेड ८१ १९ ०० स्रोत : मिशन अमृत सरोवर जनसंपर्क अधिकारी, नवी दिल्ली.
एका हेक्टरमध्ये असावे सरोवर
ग्रामीण विकास विभाग, भूमी संसाधन विभाग, पेयजल विभाग, पंचायत राज या विभागांच्या मदतीने हा उपक्रम राबवला जात आहे. ज्या जिल्ह्यात अमृत सरोवर निर्माण केले जाणार आहे तेथे कमीत कमी १ हेक्टर जागेत त्याची निर्मिती व्हायला हवी, असा नियम असणार आहे. १५ ऑगस्ट रोजी या सरोवराच्या ठिकाणी झेंडा फडकवला जाणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.