आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल लांबवला:बाहेरगावी गेलेल्या एपीआयचे घर फोडले; आठ लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला

परतूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घर बंद करून बाहेरगावी गेलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे घर फोडून ८ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. परतूर शहरातील पवार कलनी भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी एपीआय शंकर चव्हाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले शंकर बन्सी चव्हाण हे छत्तीसगड येथे गेले होते. शेजारी राहणाऱ्या लोकांना घराच्या चॅनल गेटचा कुलूप-कोयंडा तुटलेला दिसल्याने त्यांनी घरी चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला. ओळखीच्या लोकांनी घरी जाऊन पाहण्यास सांगितले असता घराचे चॅनल गेटचे कुलूप व कोयंडा तुटलेला दिसला.

गेटच्या आतील दरवाजाचे कुलूप-कोयंडा तोडून घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घरातील तिन्ही कपाटे उघडी दिसली. चोरी झाल्याचे लक्षात आल्याने पाहणी केली असता स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्या-चांदी व रोख रक्कम चोरीस गेली. त्यात एक लाख सात हजार रुपये नगदी, तसेच ६ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल पळवून नेला.

याप्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक शंकर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन गट्टुवार हे करीत आहेत.

श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण
या घटनेची मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी आर. डी. मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, सहा पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे, तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नितीन गट्टुवार यांनी भेट दिली, तर घटनास्थळी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले.

बातम्या आणखी आहेत...