आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील वालूर मंडळातील २०२० मधील अतिवृष्टीच्या अनुदानापासून वगळलेल्या वालुर महसूल मंडळाअंतर्गत असलेल्या २१ गावांना अनुदान देण्याची मागणीसाठी रविवारपासून शेतकऱ्यांनी सेलू तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. यापूर्वी अनुदान मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी दोन वेळेस उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हे मुदत धरणे आंदोलन केले होते. तत्कालीन अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेत ते आंदोलन थांबवले. परंतु शेतकऱ्यांना मात्र मदत अद्यापही मिळाली नाही.
आता जोपर्यन्त शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार सेलू तालुका दबाव गटाचे निमंत्रक ॲड. श्रीकांत वाईकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केला आहे. यावेळी इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ, अॅड. देवराव दळवे, रामचंद्र कांबळे, लक्ष्मण प्रधान, योगेश सुर्यवंशी, जयसिंग शेळके, अब्दुल रौफ, मुकुंद टेकाळे यांच्यासह आदी शेतकरी उपोषणास बसले आहेत.
दरम्यान, अतिवृष्टीत वालूरसह परिसरातील गावच्या शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. खरीपातील नुकसान रब्बीत भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा विचार होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.