आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताचा बनाव करून खून:पत्नी सतत फोनवर बोलतेय म्हणून पतीनेच केला खून

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नी नेहमीच कोणाशी सतत फोनवर बोलतेय म्हणून ट्रॅक्टर चालकाला एक लाख रुपये देऊन अपघाताचा बनाव करून खून केल्याची कबुली संशयित गजानन आढाव याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कविता आढाव असे मृत महिलेचे नाव आहे.औरंगाबाद येथील वीज वितरण कंपनीत लिपिक असलेल्या गजानन आढाव याचे कविता साखळे या मुलीशी तिसरा विवाह झाला होता. कविता यांचा सुध्दा हा दुसरा विवाह होता. मात्र, त्यांच्यात अनेक दिवसांपासून वादावादी होत होती.

या प्रकरणी मयताच्या भावाच्या तक्रारीवरून संशयित पती गजानन आढाव व ट्रॅक्टर चालक योगेश मोरे यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर सासू व इतरांविरुद्ध ४९८ चा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गजानन आढाव याला अटक केली होती. तर टॅक्टर चालक फरार होता. त्याला ६ जानेवारी रोजी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली.

बातम्या आणखी आहेत...