आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी जीवन जगण्यासाठी तनवमुक्त राहण्याकरिता, मनाची एकग्रता वाढवण्याकरीता, योग प्राणायामाला खूप महत्व असून आपल्या दैनंदिन जीवनात सर्व शहरवासीयांनी नियमित योग प्राणायाम करून आपले आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आवाहन सुनिल आर्दड यांनी केले.
पतंजली योग समिती, मातोश्री लॉन्स यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन शिबीरात ते बोलत होते. यात ३५० नागरिकांनी सहभाग घेतला होता. स्वामी रामदेव महाराज यांच्या प्रेरणेने गेल्या दहा वर्षापासून शहरवासीयांना योग प्राणायाम द्वारे निःशुल्क सेवा देण्याचे कार्य आंतरराष्ट्रीय योग शिक्षक प्रल्हाद हरबक करत आहेत.
शिबिरात मुकुंद जहागिरदार, राहुल सरकटे यांनी विविध प्रकारचे आसन तसेच प्राणायाम चे प्रात्यक्षिक करून घेतले. सुलभा दीदी यांनी ध्यानाच्या माध्यमातून शरीर निरोगी कसे राहील याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामप्रसाद गोरे यांनी केले. यावेळी पूजा आर्दड, बागल, नितीन तोतला, राजेंद्र शेटे, वर्षा ठाकूर, डॉ. भास्कर भाले, श्रीपाद खरात, सोपान लोखंडे, सुरेंद्र न्यायाधीश, महेश देव, संजय जोशी, प्रभाकर लिपणे होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.