आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखे आंदोलन:जमिनीच्या ताब्यासाठी स्वत:ला घेतले गाडून, मंठा तालुक्यातील हेलस येथील घटना

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत आई व मावशीला मिळालेल्या जमिनीचा ताबा त्यांना मिळावा म्हणून मंठा तालुक्यातील हेलस येथील शेतकऱ्याने अनोखे आंदोलन करत स्वतःला जमिनीत गाडून घेतले. सुनील जाधव असे या आंदोलक शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव यांच्या आई व मावशीला प्रत्येकी १ हेक्टर ३५ आर जमीन शासनाकडून वर्ष २०१८-१९ मध्ये मंजूर झालेली आहे. मात्र, या जमिनीचा प्रत्यक्ष अजूनही ताबा मिळालेला नाही.

यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही जमीन ताब्यात मिळत नसल्याने जेरीस आलेल्या शेतकऱ्याने अखेर स्वतःला जमिनीत गाडून घेतले. दरम्यान, या लाभार्थींना जमिनीचा ताबा द्यावा, यासाठी मूळ मालकास तीन वेळा पत्रे दिली. मात्र, तरीही ताबा दिला जात नाही. त्यामुळे आता पोलिस बंदोबस्तात ताबा देण्यात येणार आहे, असे जालना समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...