आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात घुसून गतिमंद महिलेवर अत्याचार:जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात घडला प्रकार; गुन्हा दाखल

कुंभारपिंपळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरात घुसून एका ३० वर्षीय गतिमंद महिलेवर अत्याचार केल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील सोमवारी रात्री एका गावात घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वामन गुणाजी देवकर (६०, मूर्ती फाटा, ता.घनसावंगी) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पीडित महिला ही सोमवारी रात्री घरात एकटीच होती. त्याचवेळी वामन गुणाजी देवकर हा घरात घुसला. त्याने बळजबरीने महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर याची माहिती घनसावंगी पोलिसांना देण्यात आली. घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन संशयित वामन देवकर याला ताब्यात घेतले. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून संशयित वामन गुणाजी देवकर याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास डीवायएसपी सुनील पाटील हे करीत आहेत. आरोपीला अटक झाली असून कोर्टाने दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...