आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफआरपी’त प्रतिटन 150 रुपयांची वाढ:एफआरपीची भाववाढ म्हणजे डोळ्यात धूळफेक

वडीगाेद्री6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषिमूल्य आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार यंदाच्या साखर हंगामात ‘एफआरपी’त प्रतिटन १५० रुपयांची वाढ करण्यात आली. केंद्रीय अर्थविषक समितीने बुधवारी यास मंजुरी दिली. या निर्णयाने यंदाच्या हंगामात प्रतिटन २९०० रुपयांवरून ३०५० रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. दरम्यान, एफआरपीत वाढ केली असली तरी साखर उताऱ्याचा बेसही दहा टक्क्यांवरून १०. २५ टक्के केला आहे. एकीकडे प्रतिटन १५० रुपये वाढ केल्याचे सांगण्यात येत असले,तरी उतारा वाढविल्याने प्रत्यक्षात ही वाढ प्रतिटन ७५ रुपयेच मिळेल. केंद्रीय अर्थ समितीने शिफारस स्वीकारताना ‘एफआरपी’चा मूळ बेस मात्र वाढवून शेतकऱ्यांसोबत एका अर्थाने दगा केला.

दुसऱ्या बाजूने त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात खोडा घातला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केला आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले, कृषिमूल्य आयोगाने उसाचा वाढलेला उत्पादन खर्च,खतांचे वाढलेले दर, मशागतीसाठी येणारा खर्च विचारात घेऊन उसाच्या प्रतिटन दरात १५० रुपये वाढीची शिफारस केली होती.प्रत्यक्ष उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही शिफारस फारच तोकडी आहे.

सन २००९-१० ते २०१७-१८ पर्यंत साखर उतारा ९.५० टक्के गृहीत धरूनच एफआरपी निश्चित केली जात होती. २०१८-१९ च्या हंगामात पहिल्यांदा एफआरपी दरात वाढ करताना उतारा दहा टक्के निश्चित केला. तीन वर्षे हाच उतारा ग्राह्य मानून ‘एफआरपी’त वाढ झाली. गेल्या तीन हंगामात सुमारे ३०० रुपयांची वाढ झाली आहे.तरी साखरेच्या विक्री दरात मात्र कोणतीही वाढ केली नसल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...