आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंतेत भर:शेलूद परिसरात गहू, हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

शेलूदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील शेलूदसह परिसरात अतिवृष्टीमुळे खरिपाची पिके हातून गेली असताना त्यातून सावरत शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र मागील पाच ते सहा दिवसांपासून अनेक भागात ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसत आहे. त्यातच रोगराईमुळे औषध फवारणीचा खर्च वाढल्याने बळीराजाचा चिंता वाढली आहे.

मागील दोन वर्षापासून पावसामुळे पाणी पातळी वाढली असून विहिरीतील पाणीसाठादेखील वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीपाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बीची जोरदार तयारी केली आहे. मात्र गेल्या पाच सहा दिवसापासून भोकरदन तालुक्यातील शेलुदसह लिहा, पारध खुर्द, पारध बुद्रुक, पद्मावती, वालसावंगी, वाढोणा, धावडा, पोखरी, वडोद तांगडा परिसरात ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.

थंडी गायब झाल्यामुळे गहू, हरभरा, रब्बीचा कांदा आदी पिकांवर रसशोषक किडी वाढल्याने शेतकरी वर्गाला चिंता भेडसावत आहे. परिसरातील रब्बीच्या पेरणी पुर्ण झाली असून कांदा व गहु पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. भरपुर पाऊस झाल्याने थंडीचे प्रमाण जास्त राहील असा शेतकऱ्यांचा अंदाज होता मात्र चार पाच दिवसापासून थंडी गायब झाल्याने उगवलेल्या पिकांची वाढ खुंटली असून ती रसशोषक किडीच्या विळख्यात सापडली आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणी केलेल्या पिकांना शेतकऱ्यांवर औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे. ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे.

बळीराजाच्या खर्चात वाढ
पिकावर विविध किडीचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजाला औषध फवारणीसाठी खर्च करावा लागत आहे. त्यातच औषध फवारणीचा खर्च अधिक येत असल्याने बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अशी प्रतिक्रिया विशाल खडके यांनी दिली. खराब हवामानामुळे रोग गहू, हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढु लागला आहे. मावा, तुडतुडे तसेच गव्हाचा उतारा कमी प्रमाणात उतरण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...