आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोत्साहन:बेस्ट पोलिसिंगमध्ये उस्मानाबाद अव्वल, औरंगाबाद दुसऱ्या स्थानी, बीड तळाला; पोलिस महानिरीक्षकांनी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद परिक्षेत्रात 37 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट कामगिरी

पोलिस दलात सकारात्मक बदल व्हावेत यासाठी औरंगाबाद परिक्षेत्राचे महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी विविध उपाययोजना राबवणे सुरू केले आहे. त्यांच्या परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील गुन्हेगारी, तपास, प्रलंबित गुन्हे, जप्त मुद्देमाल, ठाण्यांची स्थिती अशा विविध घटकांवर सहा महिन्यांचा आढावा घेतला. या कालावधीत विविध गुन्हे उघडकीस, तर चांगला तपास करून ३० पेक्षा जास्त रिवॉर्ड मिळवणाऱ्यांची माहिती मागवली होती. यात औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना या जिल्ह्यातील ३७ जण पात्र आहेत. परंतु, बीडमधील एकही पोलिस यासाठी पात्र झाला नाही.

आयजींची कौतुकाची थाप मिळालेल्यांमध्ये जालन्यातूनही सात शिलेदार आहेत. बेस्ट पोलिसिंग करणाऱ्या या ३७ जणांची आयजींकडून निघत असलेल्या ‘कॉन्स्टेबल फर्स्ट’ या पुस्तकातही नोंद होत आहे. जसजशी लोकसंख्या वाढत जात आहे तसतशी गुन्ह्यांमध्येही वाढ होऊ लागली आहे. परंतु, पोलिसांचे मनुष्यबळ तेवढेच असल्यामुळे प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाची संख्या वाढली आहे. तसेच पोलिसांवर वाढत्या गुन्ह्यांच्या तपासाचाही भार पडू लागला आहे. यामुळे पोलिसांचे मन प्रसन्न राहावे, त्यांच्याकडून जास्तीत जास्त चांगले काम व्हावे, पारदर्शकता यावी या उद्देशाने प्रत्येक ठाणे सुधारण्याकडे प्रशासनाने कल दिला आहे.

ठाण्यांमध्ये स्वच्छता, ठाण्यांचा एकच रंग, आधुनिक यंत्रणा देणे तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्यांना रिवॉर्ड देणे अशा विविध नावीन्यपूर्ण उपाययोजना राबवल्या आहेत. दरम्यान, आयजी मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी सहा महिन्यांचा आढावा घेण्यासह विविध शाखा, ठाण्यांमधील टॉप अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेतल्या. यात तिन जिल्ह्यांतील ३७ जणांनी उत्कृष्ट काम केले आहे. विनायक देशमुख, मोक्षदा पाटील, आर. राजा, राजतिलक रोषण हे पोलिस अधीक्षक ज्या-त्या जिल्ह्यातील पदभार पाहत आहेत.

विविध जिल्ह्यांतील हे आहेत शिलेदार
जालना : एलसीबी पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, परतूर ठाण्याचे श्यामसुंदर कोठाळे, व्ही. एस. मोरे, चंदनझिरा ठाण्याचे पीएसआय प्रमोद बोंडले, अंबडचे एस. एस. पाचरणे, घनसावंगीचे आर. बी. मोरे, चंदनझिरा ठाण्याचे अनिल काळे हे शिलेदार ठरले आहेत.
औरंगाबाद : खुलताबाद- सीताराम मेहेत्रे, गंगापूर- एम. लोहकरे, अनमोल केदार, पैठण-अर्चना पाटील, मुठाळ, एलसीबी संजय भोसले, सायबर रवी लोखंडे, गणेश खंडागळे.
उस्मानाबाद : रामेश्वर खनाळ, एम. डी. निलंगेकर, आशिष खांडेकर, पी. व्ही. माने, सदाशिव भुजबळ, अमोल चव्हाण, अविनाश मारलापल्ली, बाबासाहेब कांबळे, अमोल बनसोडे, दिलीप जगदाळे, बिभिषण कुंभार, पांडुरंग सावंत, दीपक लावरेपाटील, हुसेन सय्यद, रवींद्र अर्सेवाड, अमोल कावरे, एम. डी. घुगे, व्ही. एन. काझी.

याबाबतची माहिती पाठवण्यात आली
जिल्ह्यातील विविध शाखांतील तसेच विविध ठाण्यांतील उत्कृष्ट काम तसेच जास्तीत जास्त रिवॉर्ड मिळणाऱ्यांची माहिती वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आली आहे. उत्कृष्ट तपास करणाऱ्यांची नावे पुस्तकात नोंदवली जात आहेत. -विनायक देशमुख, पोलिस अधीक्षक, जालना.

बातम्या आणखी आहेत...