आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्यात काही जणांना पोलिसांकडून मारहाण झाल्याची कथीत आॅडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही क्लिप खरी आहे का, पोलिसांनी खरंच मारहाण केली का, मारहाण का करावी लागली, शेतीच्या वादातूनच ही घटना घडली का, दोन्ही गटात काय वाद आहे, पोलिसांवर कुणी दबाव टाकत होते का, पोलिसांनी वैयक्तिक रोषातून मारहाण केली का, या बाबतचा अहवाल करुन तिन दिवसांमध्ये पोलिस अधीक्षकांना देणार असल्याची माहिती डीवायएसपी राजू मोरे यांनी दिली आहे.
जालना जिल्ह्यातील कोकाटे हादगाव येथे शेतीच्या झालेल्या वादातून भांडण झाले होते. याची तक्रार देण्यासाठी आष्टी पोलिस चौकीला गेले असता मारहाण करण्यात आली असा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीची आॅडीओ क्लिप व्हायरल झाल्याने एपीआय शिवाजी नागवे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली. तेथील पदभार सावळे यांच्याकडे देण्यात आला. या पार्श्वभूमीवर डीवायएसपी मोरे यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
सर्व बाजूंनी तपास करून अहवाल देणार
कोकाटे हदगाव येथे एका समाजातील दुसऱ्या समाजातील व्यक्तींना मारहाण केली. या मारहाणीतून परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहेत. मारहाण झाली किंवा नाही हे तपासणार आहोत. मारहाणीच्या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करून अहवाल वरिष्ठांना देण्यात येईल. राजू मोरे, डीवाएसपी, परतूर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.