आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मशानभूमी:सामंजस्याने सुटला सिपोरा बाजार येथील स्मशानभूमी जागेचा प्रश्न

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथील हिंदू समाजाच्या स्मशान भूमीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. पंचायतकडून शादल बाबा दर्गा येथील इनाम जागा देण्यात आली आहे.

ग्रामपंचायतने हिंदू समाजाच्या स्मशान भूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती. याबाबत ३० ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी सरपंच तसेच ग्रामसेवक यांना धारेवर धरले होते. या प्रकरणाची तीव्रता लक्षात घेत येथील राजकीय नेते बी. एन. कड, विजय कड यांनी मध्यस्थी केली. अन् स्मशान भूमीसाठी एक बैठक घेतली.

यामधे सर्व समाज व्यक्तींना सहभागी करून घेण्यात आले. यावेळी सामजस्यातून गावातील शादल बाबा दर्गा यासाठी देण्यात आलेल्या इनामी जमीन मधून जागा देण्याचा प्रस्ताव मांडला. याला सर्वांनी सहमती दर्शविली. तर जागेचे थेट उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोरगाव येथील सरपंच नारायण दळवी, कैलास कड, मधू कड, शंकर कड, कौतिक मास्तर, नाना कड, शिवाजी कड, सुदाम कड, रहमान भाई, सफी भाई, असलम पठाण, विठ्ठल सोरमारे, मोठेबा कड यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...