आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना ते जळगांव या नवीन रेल्वे मार्ग मंजुर करुन जालना जिल्हयासह भोकरदन व सिल्लोड तालुक्याच्या विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. जालना ते जळगांव रेल्वे मार्गाचा उपयोग केवळ प्रवासी वाहुकीसाठीच होणार नसुन त्यामुळे जालना जिल्हयातील शेतमाल वाहतुकीस तसेच जालना येथील स्टील उदयोगासाठी मोठया प्रमाणावर फायदा होणार असुन त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये हजारो रोजगारांच्या संधी निर्माण होणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.
भोकरदन तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग कुंभारी फाटा-हसनाबाद-जवखेडा-राजुर-देऊळगांव राजा या रस्त्याच्या जवखेडा येथील गाव अंतर्गंत उर्वरीत रस्ता काॅंक्रीटीकरण करणे या कामासह भोकरदन शहरातील केळणा नदीवर रिकाम टेकडी येथे पुलाचे बांधकाम करणे २ कोटी ५० लाख रुपये तर ईदगाह मैदान येथे सिमेंट काॅंक्रेटीकरणासह संरक्षण भिंत बांधकाम करणे ६७ लाख रुपये किंमतीच्या कामाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संतोष पाटील दानवे, आमदार नारायण कुचे, तुकाराम जाधव, भास्कर दानवे, मधुकर दानवे, सभापती कौतीकराव जगताप, सुधाकर दानवे, कैलास गव्हाड, आत्माराम सुरडकर, भाऊसाहेब भुजंग, सोमिनाथ हराळ, गजानन इंगळे, राहुल ठाकुर, नजीरभाई, शेख तौसीफ, वाहेद शहा, नाजेम शेख, नईम कादरी, रमेश मोकासे, रमेश बिरसोने, जफरभाई, हमदभाई आदींची उपस्थिती होती.
मंत्री दानवे म्हणाले, भोकरदन शहरातील मुस्लीम समाजासाठी ६७ लाख रुपये किंमतीच्या ईदगाहचे बांधकाम पूर्ण करुन रमजान महिण्याच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधुन आज त्याचा लोकापर्ण सोहळा होत आहे. गेल्या अनेक वर्षापासुन भोकरदन व आलापुरला जोडणाऱ्या केळणा नदीवरील जुन्या व जीर्ण झालेल्या पुला ऐवजी नविन मजबुत पुलाचे बांधकाम करण्याची मागणी आलापुर येथील ग्रामस्थांनी माझ्याकडे व आमदार संतोष दानवे यांच्याकडे केलेली होती. त्या अनुषंगाने जालना मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात ६ कोटी रुपयांचे रस्त्याचे कामे मंजुर करीत असतांनाच फडणविस सरकारच्या कार्यकाळात या पुलासाठी २०१९ साली २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी आम्ही मंजुर करुन आणला होता. परंतु मागील दोन वर्षापासुन संपूर्ण देशात कोरोणा विषाणुने थैमान घातल्यामुळे महाराष्ट्र राज्यही त्यास अपवाद राहिले नव्हते. मागच्या दोन वर्षाच्या काळात इतर विकास कामांपेक्षा जनतेच्या आरोग्यालाच प्राधान्य देणे महत्वाचे असल्यामुळे सदर पुलाला मंजुरी असतांनासुध्दा शासनाकडुन निधी प्राप्त होत नव्हता. निधी अभावी या पुलाचे काम प्रलंबीत होते. परंतु आम्ही सदर पुलाच्या निधीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करुन आता वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गंत निधीची तरतुद करुन घेतल्यामुळे आता या पुलाचे काम तातडीने पूर्ण होणार आहे.
या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी केला असला तरी भोकरदन तालुक्यातील जनता सुज्ञ असुन विकास कामांसाठी निधी कोण आणु शकतो याची पुरेपुर जाणीव त्यांना असल्यामुळे जनता विरोधकांच्या भुल थापांना बळी पडणार नाही. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्यामुळे मी या संधीचे सुवर्णसंधीमध्ये रुपांतर करुन आजपर्यंतच्या कार्यकाळात जालना लोकसभा मतदारसंघामध्ये ड्रायपोर्ट, आय.टी.सी.कॉलेज यासह अनेक नविन राष्ट्रीय महामार्ग मंजुर करुन मतदारसंघातील दळणवळणाला चालना देण्याचे काम सातत्याने केले आहे. असे सांगितले. यावेळी मतदारसंघातील एस.टी.कर्मचारी विलनीकरणासह विविध मागण्यासाठी संपावर गेलेले आहे. त्यामुळे त्यांचे वेतन राज्यशासनाने रोखुन धरले आहे. त्यामुळे एस.टी.कर्मचारी व त्यांच्या परिवारवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना किरणा सामानाचे वाटप आमदार संतोष दानवे यांच्या उपस्थितीत केंद्रीय राज्यमंत्री .रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
मदत नव्हे तर कर्तव्य
राज्यसरकारच्या आडमुठे धोरणामुळे एस.टी.कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ‘‘मदत नव्हे तर कर्तव्य’’ किराणा सामानाचे वाटप केले. कायदेशिर मार्गाने शांतते लढा देवु व शासनाकडुन मागण्या मान्य करुन घेवु त्यामुळे कुठल्याही प्रकारे या आडचणीच्या काळात खचुन जाण्याची आवश्यकता नाही. भोकरदन-जाफराबाद तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा विश्वास आमदार संतोष दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.