आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अपघातात जवान जागीच ठार‎

वडीगोद्री‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आसाममध्ये सीमा सुरक्षा रक्षक म्हणून‎ ‎ कार्यरत असलेले‎ ‎ वडीगोद्री येथील‎ ‎ हनुमान यशवंता‎ ‎ लिपणे (४३)‎ ‎ यांच्या दुचाकीला‎ ‎ (एमएच २१ एजे‎ ‎ ५७९९) पाठीमागून‎ ‎ येणाऱ्या पिकअपने‎ (एमएच ०६ एजी ७५६९) जाेराची‎ धडक दिली. यात ते जागीच ठार झाले.‎ ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ‎ वाजेदरम्यान धुळे-सोलापूर राष्ट्रीय‎ महामार्गावरील भालगाव फाट्यावर‎ घडली.

हनुमान लिपणे यांच्या‎ मुलीचा चार दिवसांपूर्वी विवाह पार‎ पडला हाेता. रविवारपर्यंत ते सुटीवर‎ आले होते. औरंगाबाद येथे शिक्षण घेत‎ असलेल्या मुलाच्या शाळेची फी जमा‎ करून तसेच भेट घेत दुचाकीवरून‎ वडीगोद्रीकडे येत असताना ही घटना‎ घडली. दरम्यान, शनिवारी त्यांच्यावर‎ वडीगोद्री येथे अंत्यसंस्कार करण्यात‎ आले. लिपणे यांच्या पत्नीचेही निधन‎ झालेले अाहे. यामुळे त्यांच्या मुलगा‎ व मुलीचेही छत्र हरवले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...