आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमी:बच्चे कंपनीने लुटला झोके खेळण्याचा आनंद ; श्रावण मासातला पहिला सण

श्रीक्षेत्र राजूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिन्यातील नागपंचमी सणाला भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर येथे महिलांनी नागरूपी वारुळाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले तर बच्चेकंपनीने झोका खेळण्याचा आनंद लुटला. श्रावणात ऊनसावल्यांचा खेळ चालत असतो. पावसाची रिमझिम, झऱ्यांचा झुळझुळ आवाज, निसर्गातील हिरवीगार वनराई यामुळे सगळीकडे प्रसन्नता असते. श्रावणात नागपंचमी हा सण साजरा होत असल्याने यादिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते. या सणाच्या निमित्ताने विवाहित मुली माहेरी येतात. नागपंचमीला महिला व मुली झोके खेळत आनंद लुटतात.

राजुरमध्ये नागपंचमीच्या सणाला महिला व मुलींनी नवीन वस्त्रे व अलंकर परिधान करून दिवसभर झोके खेळले. शाळकरी मुलींही नवीन ड्रेस घालून समूहाने घराबाहेर पडून झोके खेळण्यात दंग होऊन गेल्याचे चित्र दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...